‘Aspirant’ फेम अभिनेता ३९ व्या वर्षी अडकला लग्नबंधनात; फोटो आले समोर
मनोरंजनविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. 'Aspirant' सीरिजमधील लोकप्रिय अभिनेता नवीन कस्तुरिया लग्नबंधनात अडकला आहे. ३९ वर्षीय नवीनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली. त्याच्या पत्नीचे नाव शुभांगी शर्मा आहे. अभिनेत्री हर्षिता गौरनेही त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. नवीनने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.