‘भूतम् भयम्’च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली; सप्टेंबरपासून ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहता येणार
अलीकडे प्रदर्शित झालेला छाया कदम यांचा 'भूतम् भयम्' हा मराठी चित्रपट आता ओटीटीवर येत आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी झी ५ वर रिलीज होणाऱ्या या चित्रपटात सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे, नील सालेकर, आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट सात मित्रांच्या प्राचीन नाण्याच्या शोधाभोवती फिरतो. दिग्दर्शक रामचंद्र गांवकर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.