थिएटर्समध्ये फ्लॉप झालेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत ट्रेंडिंग, तुम्ही पाहिलेत का?
बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दरवर्षी अनेक सिनेमे प्रदर्शित होतात, पण सर्वच यशस्वी ठरत नाहीत. २०२५ मध्ये 'छावा' हा एकमेव ब्लॉकबस्टर ठरला. अजय देवगणचा 'आझाद', अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स', कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' आणि वरुण धवनचा 'बेबी जॉन' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले, पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगले ट्रेंड झाले.