भर रस्त्यात सापडतात छाटलेले हात अन्…; ७.९ रेटिंग असलेला ‘हा’ चित्रपट ओटीटीवर नक्की पाहा
ओटीटीवर रोमँटिक चित्रपट पाहून कंटाळा आला असेल आणि मर्डर मिस्ट्री पाहायची असेल, तर 'युथम सेई' हा तमिळ चित्रपट उत्तम पर्याय आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेला हा डार्क क्राईम थ्रिलर चेन्नईतील मानवी छाटलेले हात सापडण्याच्या घटनेवर आधारित आहे. अभिनेता चेरनने साकारलेला अधिकारी जे.के. कृष्णमूर्ती या प्रकरणाचा तपास करतो. चित्रपटाला आयएमडीबीवर ७.९ रेटिंग मिळाले आहे आणि तो जिओहॉटस्टारवर उपलब्ध आहे.