उत्तर प्रदेशातील सत्य घटनेवर आधारित ३ एपिसोड्सची सीरिज, प्रत्येक सीन पाहून डोकं चक्रावेल
'हाथरस 16 डेज' ही सत्य घटनेवर आधारित क्राईम थ्रिलर डॉक्युमेंटरी सीरिज सध्या ZEE5 वर गाजत आहे. २०२० साली उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षांच्या दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि १६ दिवसांच्या तपासाची धक्कादायक बाजू या सीरिजमधून समोर आणली आहे. पॅट्रिक ग्रॅहॅम यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरिज ३ भागांची असून, अंजली शिवारमन, पावेल गुलाटी यांसारख्या कलाकारांनी काम केले आहे.