श्रुती मराठेच्या ‘या’ सीरिजला मिळाले तब्बल ३.१ कोटी व्ह्यूज, ओटीटीवर घालतेय धुमाकूळ
दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि त्यांचा मुलगा वीर हिरानी यांनी 'प्रीतम अँड पेड्रो' या वेब सीरिजद्वारे ओटीटी विश्वात नवा इतिहास रचला आहे. जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या या सायबर क्राइम कॉमेडी-थ्रिलर सीरिजला ३.१ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि ७.३ कोटी वॉच आवर्स मिळाले आहेत. अरशद वारसी, वीर हिरानी, विक्रांत मॅस्सी, श्रुती मराठे, बोमन इराणी आणि मोना सिंह यांच्या अभिनयाने सजलेली ही सीरिज प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करत आहे.