राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘हा’ बॉलीवूड चित्रपट तब्बल १३ वर्षांनी ओटीटीवर रिलीज
राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'शाहिद' चित्रपट १३ वर्षांनंतर अखेर ओटीटीवर 'प्राइम व्हिडीओ'वर रिलीज झाला आहे. राजकुमार रावने शाहिद आझमी यांची भूमिका साकारली आहे. अपूर्व एम. असरानी यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शना विषयी पोस्ट शेअर केली. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवण्यात आले होते.