रिलीज होताच ‘हा’ सिनेमा नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग, तुम्ही पाहिलात का?
तमिळ सुपरस्टार सूर्याचा 'विश्वनाथ अँड सन्स' हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता आणि आता ११ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत १ नंबरवर ट्रेंड करत आहे. या चित्रपटाने अजय देवगणचा 'धमाल ४', आर. माधवनचा 'GND' आणि तापसी पन्नूचा 'गांधारी' या चित्रपटांना मागे टाकले आहे. वेंकी अट्लुरी दिग्दर्शित या चित्रपटात सूर्याबरोबर ममिता बैजू, राधिका सरथकुमार आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहेत. 'विश्वनाथ अँड सन्स'ने भारतात १२१.५० कोटी आणि जगभरात २०५.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.