सैफ अली खानचे २० वर्षांनी लहान अभिनेत्रीबरोबर किसिंग सीन, रोमँटिक गाणं पाहिलंत का?
अभिनेता सैफ अली खान 'ज्वेल थीफ' या क्राइम थ्रिलर चित्रपटात जयदीप अहलावत आणि निकिता दत्ता यांच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटातील 'इल्जाम' गाणं १७ एप्रिलला रिलीज झालं असून, सैफ आणि निकिताच्या रोमँटिक सीनची चर्चा आहे. निकिता सैफपेक्षा २० वर्षांनी लहान आहे. 'ज्वेल थीफ'चा ट्रेलर १४ एप्रिलला रिलीज झाला असून, चित्रपट २५ एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.