सैफ अली खानच्या हल्लेखोराला इब्राहिमचा सिनेमा दोनदा पाहायची शिक्षा… प्रणित मोरेची कमेंट
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने 'नादानियां' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी इब्राहिम व खुशी कपूरला ट्रोल केलं जात आहे. मराठी कॉमेडियन प्रणित मोरेने इब्राहिमच्या अभिनयाची खिल्ली उडवली आहे. 'नादानियां' नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून, प्रेक्षकांना कथा व अभिनय आवडलेला नाही. प्रणितने खुशी कपूरच्या अभिनयावरही टीका केली आहे.