नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ ‘या’ तारखेला ओटीटीवर होणार रिलीज,घ्या जाणून…
ओटीटीवर लवकरच 'मटका किंग' ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून, सई ताम्हणकर आणि कृतिका कामरा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित ही सीरिज १७ एप्रिलला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर येणार आहे. १९६० च्या मुंबईतील एका कापूस व्यापाऱ्याची कथा सांगणारी ही सीरिज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.