बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा ‘निशांची’ ते दिलीप प्रभावळकरांचा ‘दशावतार’, पाहा ‘हे’ सिनेमे
या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी विविध जॉनरच्या मनोरंजनाची मेजवानी आहे. 'निशांची' हा अनुराग कश्यप दिग्दर्शित क्राइम ड्रामा, ज्यात ऐश्वर्य ठाकरे मुख्य भूमिकेत आहे, १४ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. 'इन्स्पेक्शन बंगलो' ही मल्याळम हॉरर-कॉमेडी वेब सीरिज झी-५ वर, 'जॉली एलएलबी ३' नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टारवर, तर 'दशावतार' हा मराठी सस्पेन्स थ्रिलर झी-५ वर १४ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे.