Phir Aayi Hasseen Dillruba Review: ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ म्हणजे फसलेला प्रयोग!
'फिर आयी हसीन दिलरुबा' हा तापसी पन्नू व विक्रांत मॅस्सीच्या 'हसीन दिलरुबा'चा दुसरा भाग आहे. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. चित्रपटात रानी व रिशू आग्र्यात नवीन आयुष्य सुरू करतात. अभिमन्यूच्या प्रवेशाने त्यांच्या आयुष्यात नवीन ट्विस्ट येतात. चित्रपटात सस्पेन्स असला तरी तो रटाळवाणा वाटतो. अभिनय चांगला असला तरी कथेवर मेहनत घेतलेली नाही.