मराठी चित्रपट ‘पाणी’ ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित, प्रियांका चोप्राने दिली माहिती
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला मराठी चित्रपट 'पाणी' आता प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. प्रियांका चोप्राने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती दिली. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' चित्रपट पाणीटंचाईच्या समस्येवर भाष्य करतो. हनुमंत केंद्रे यांच्या वास्तव कथेला चित्रपटात स्थान देण्यात आले आहे. चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता, आता ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.