८० कोटींची कमाई करणारा ‘थाई किझवी’ चित्रपट अखेर ओटीटीवर दाखल, कधी व कुठे पाहायचा?
'थाई किझवी' हा तमीळ चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असून, आता १० एप्रिलपासून 'जिओ हॉटस्टार' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने ८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची कथा पावनुथाई नावाच्या ७० वर्षांच्या महिलेभोवती फिरते, जी संपत्तीच्या वाटणीसाठी तिच्या मुलांशी संघर्ष करते.