Netflix वर ट्रेंड होतोय ‘हा’ चित्रपट, ‘धुरंधर’ अन् ‘मर्दानी ३’ला टाकलं मागे
नेटफ्लिक्सवर १५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला राजकुमार रावचा 'टोस्टर' चित्रपट अल्पावधीतच ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. रणवीर सिंहचा 'धुरंधर' आणि राणी मुखर्जीचा 'मर्दानी ३' यांसारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकत 'टोस्टर'ने ९२ लाख तासांच्या व्ह्यूइंग अवर्ससह ४४ लाख व्ह्यूज मिळवले आहेत. विवेक दास चौधरी दिग्दर्शित या चित्रपटात अर्चना पूरन सिंह, फराह खान, अभिषेक बॅनर्जी, उपेंद्र लिमये आणि सीमा पाहवा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.