रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ला मागे टाकत ‘हा’ क्राईम थ्रिलर चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये
सध्या नेटफ्लिक्सवर 'मर्दानी ३' हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. राणी मुखर्जीने साकारलेली पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयची भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. चित्रपटात लहान मुलींच्या अपहरणाच्या केसचा तपास करताना शिवानीला 'भिकारी माफिया'चा पर्दाफाश करावा लागतो. २ तास ९ मिनिटांचा हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता आणि आता नेटफ्लिक्सवरही यशस्वी ठरला आहे.