४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला रितेश देशमुखचा ‘हा’ सिनेमा ओटीटीवर रिलीज, कधी व कुठे पहाल?
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या मुख्य भूमिकेत असलेला 'मस्ती 4' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थिएटरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा सिनेमा १६ जानेवारी २०२६ पासून ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. 'मस्ती' फ्रँचायझीची सुरुवात २००४ मध्ये झाली होती. 'मस्ती 4' चे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले असून निर्मिती ए. झुनझुनवाला आणि इतरांनी केली आहे.