आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवलेला ‘साबर बोंडं’ अखेर ओटीटीवर रिलीज; कधी व कुठे पाहता येणार?
दिग्दर्शक रोहन कानवडे यांच्या 'साबर बोंडं' या चित्रपटाने सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रॅण्ड ज्युरी प्राईज जिंकला होता. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 'साबर बोंडं'ची कथा आनंद आणि बाळ्या यांच्या समलैंगिक नात्यावर आधारित आहे. आनंदचे पालक त्याच्या समलैंगिकतेला स्वीकारतात, पण बाळ्याच्या घरची परिस्थिती वेगळी असते. या नात्याचे पुढील टप्पे चित्रपटात उलगडतात.