३ तास २२ मिनिटांचा चित्रपट ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड; ‘धुरंधर’ला टाकलं मागे
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाच्या यशानंतर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बॉर्डर २’ चित्रपटाने प्रचंड प्रतिसाद मिळवला आहे. २३ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत ‘धुरंधर’ला मागे टाकले आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.