२ तास ३५ मिनिटांचा सिनेमा पाहून डोकं चक्रावेल, ट्विस्ट इतके जबरदस्त की शेवटपर्यंत बघाल
अलीकडे ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा ट्रेंड वाढला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांची क्रेझही वाढली आहे. 'ट्रान्स' हा २०२० मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. फहाद फासिल मुख्य भूमिकेत असून, अनवर रशीद यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात विजू प्रसाद नावाचा मोटिव्हेशनल स्पीकर नैराश्यातून पादरी बनतो. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.