Underrated Thriller Movies on OTT
1 / 31

डोकं चक्रावणारे ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

ओटीटी November 6, 2024

भारतात अनेक थ्रिलर चित्रपट बनतात, परंतु काहींना तेवढी लोकप्रियता मिळत नाही. 'रात अकेली है', 'मोनिका, ओ माय डार्लिंग', 'दृश्यम 2', 'सी यू सून', 'जॉनी गद्दार' आणि 'कप्पेला' हे असेच काही चित्रपट आहेत. हे चित्रपट नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहेत. या चित्रपटांमध्ये अनेक ट्विस्ट आहेत आणि त्यांना आयएमडीबीवर चांगले रेटिंग मिळाले आहे.

Swipe up for next shorts
Shreya Ghoshal and ganesh acharya dance on sooseki song of pushpa 2 movie
2 / 31

‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर श्रेया घोषाल-गणेश आचार्य यांचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्तानेच सुप्रसिद्ध गणेश आचार्य यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेया घोषाल गणेश आचार्य यांच्याबरोबर ‘सूसेकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघांच्या या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Swipe up for next shorts
Albanian singer dua lipa surprises shahrukha khan fans at Mumbai live concert
3 / 31

दुआ लिपाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुखच्या चाहत्यांना दिलं जबरदस्त सरप्राइज, पाहा व्हिडीओ

जगप्रसिद्ध गायकांचे नेहमी मुंबईत लाइव्ह कॉन्सर्ट होतं असतात. या लाइव्ह कॉन्सर्टला अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावतात. नुकताच जगप्रसिद्ध गायिका दुआ लिपाचा मुंबईत लाइव्ह कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टला सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनी खास हजेरी लावली होती. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानींची धाकटी सून राधिका अंबानी, ईशा अंबानी पाहायला मिळाली. दुआ लिपाच्या लाइव्ह कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Swipe up for next shorts
Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar statement about second season
4 / 31

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी मधुराणी प्रभुलकरचं भाष्य, म्हणाली…

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकताच इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. अरुंधती ही भूमिका तिच्या वाट्याला कशी आली? याविषयी सांगितलं. तसंच लवकरच नव्या प्रोजेक्टमधून भेटीला येणार असल्याचा खुलासा केला. याशिवाय तिने ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी देखील भाष्य केलं.

aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar new project coming soon
5 / 31

मधुराणी प्रभुलकर लवकरच झळकणार नव्या भूमिकेत, इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये केला खुलासा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. १९ नोव्हेंबरला या मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस पार पडला. त्यानंतर ३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्यानिमित्ताने महाराष्ट्राची लाडकी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी मधुराणीने आपल्या आगामी नव्या प्रोजेक्टविषयी भाष्य केलं.

Aai kuthe kay karte fame Sumant Thakre shared emotional post after serial off air
6 / 31

“हे थोडं अस्वस्थ करणारं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला…

गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ अखेर संपली आहे. ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. यानिमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिष म्हणजेच अभिनेता सुमंत ठाकरेने भलीमोठी भावुक पोस्ट लिहिली आहे.

Shani Gochar 2025 Saturn Transit meen 2025
7 / 31

२०२५ मध्ये शनीदेव मीन राशीत प्रवेश करताच ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव!

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनीला सर्वात शिस्तप्रिय, शक्तिशाली आणि बलवान ग्रह मानले जाते. तसेच शनी हा सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह असल्याने त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. नवीन वर्ष २०२५ शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यांना आर्थिक लाभासह अनेक आनंदाच्या गोष्टी कानावर पडू शकता.त्यामुळे नवीन वर्षात शनीच्या मीन राशीतील परिवर्तनाने कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो हे जाणून घेऊ…

Sayani Gupta says actor kissed him after director said cut
8 / 31

“दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तो मला…”,बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला किसिंग सीनचा अनुभव

अभिनेत्री सयानी गुप्ता 'जॉली एलएलबी २', 'जब हॅरी मेट सेजल', 'आर्टिकल १५' आणि 'बार बार देखो' सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. एका मुलाखतीत तिने सिनेक्षेत्रातील अनुभव सांगितले. इंटिमेट सीन शूट करताना सहकलाकाराने मर्यादा ओलांडल्याचा प्रसंग तिने उघड केला. 'ख्वाबों का झमेला' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने सेटवर इंटिमसी को-ऑर्डिनेटर्सबद्दल मत मांडले. 'फोर मोअर शॉट्स प्लीज'च्या शूटिंगदरम्यान अस्वस्थ अनुभवही तिने शेअर केला.

Deputy Chief Minister
9 / 31

राज्याला पुन्हा मिळणार दोन उपमुख्यमंत्री, पण हे पद नावापुरतंच! उल्हास बापटांनी केलं स्पष्ट

२०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. २०२२ मध्ये राजकीय बदलांमुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. २०२३ मध्ये अजित पवारांनी बंड करून सत्तेत सामील झाल्याने राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले. मात्र, हे पद घटनात्मक नसल्याचं प्रा. उल्हास बापट यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेत उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही, ते फक्त नावापुरतं असतं, असं त्यांनी सांगितलं.

Eknath Shinde Health Update
10 / 31

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट! डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती!

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना ताप, सर्दी आणि घशाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती डॉ. आर. एम. पार्टे यांनी दिली. शिंदे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी साताऱ्यातील दरे गावी गेले होते. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच ते बरे होतील. उद्या ते मुंबईला परतणार आहेत.

Eknath Shinde Maharashtra Government Formation
11 / 31

“बोटीने प्रवास करून भेटायला आलो, पण…”, प्रकृती बिघडल्याने शिंदेंचा भेटण्यास नकार

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून ५ डिसेंबरला मुंबईत शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृती बिघडल्यामुळे सातारा येथील त्यांच्या गावात उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी आले होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट नाकारली आहे.

Maharashtra Government Formation
12 / 31

मोठी बातमी! राज्यात ५ डिसेंबरला स्थापन होणार नवं सरकार

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आझाद मैदान, मुंबई येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

Success Story of adarsh kumar son of egg seller becomes judge cracked bpsc judicial services exam
13 / 31

अंडी विक्रेत्याचा मुलगा होणार न्यायाधीश! आईने काढलेल्या कर्जावर घेतलं शिक्षण

करिअर December 1, 2024

बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने BPSC 32 व्या न्यायिक सेवा परीक्षेचा अंतिम निकाल २०२४ जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांच्या संघर्षाच्या आणि मेहनतीच्या कहाण्या समोर येत आहेत. त्यातील एक यशोगाथा म्हणजे औरंगाबादमधील शिवगंज येथील आदर्श कुमार यांची. BPSC ची ३२ वी न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आदर्श कुमार न्यायाधीश बनले आहेत.

Ajit pawar on maharashtra government formation
14 / 31

महायुतीचं ठरलं! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

महाराष्ट्रात महायुती सरकारला बहुमत मिळालं असतानाही मुख्यमंत्री आणि इतर पदांवरून सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अडून होते, परंतु त्यांनी अडसर नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर हालचाली वाढल्या. अजित पवारांनी सांगितलं की, भाजपाचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी मुंबईतील बैठक रद्द करण्यात आली होती.

Uddhav Thackeray Meet Baba Adhav
15 / 31

“शेतात का जावं लागतंय”, ठाकरेंची बोचरी टीका, म्हणाले, “अमावस्येचा मुहूर्त…”

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम घोटाळ्यावरून पुण्यात आत्मक्लेष उपोषण पुकारलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. शिंदे साताऱ्यातील दरे गावी अस्वस्थ असल्याने गेले असून, नॉट रिचेबल आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या राक्षसी बहुमतावर प्रश्न उपस्थित केले. शेवटी, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं.

Aasiya Kazi Married to Gulshan Nain:
16 / 31

लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्रीने केलं आंतरधर्मीय लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

'बंदिनी' फेम अभिनेत्री आसिया काझीने अभिनेता गुलशन नैनशी आंतरधर्मीय लग्न केलं आहे. आठ वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी खासगी सोहळ्यात विवाह केला. त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर आले असून, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आसियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लग्नातील काही खास क्षण शेअर केले आहेत.

Vitamin d deficiency impact health how to increase vitamin d levels
17 / 31

तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता आहे? मग होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात…

हेल्थ November 30, 2024

आवश्यक पोषणतत्त्वांमध्ये व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते हाडांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, रोगप्रतिकारक यंत्रणा समर्थनासाठी आणि शरीराच्या विविध कार्यांचे नियमन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जगभरात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत आणि काही लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची इतकी कमतरता असते की त्यांच्या व्हिटॅमिन डीच्या पातळीची संख्या एका आकड्यात असते.

rohit pawar on cm devendra fadnavis mahayuti
18 / 31

“लग्न ठरलंय…”, रोहित पवारांची खोचक पोस्ट; महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत म्हणाले…

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर महायुतीला २३५ जागा मिळाल्या असून, भाजपाने १३२, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या. तरीही मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय न झाल्याने राजकीय तणाव वाढला आहे. रोहित पवारांनी सध्याच्या स्थितीला लग्न समारंभाची उपमा देत खोचक टीका केली आहे. शिवसेनेला गृहमंत्रीपदाची अपेक्षा असून, अजित पवारांना अर्थखातं मिळण्याची शक्यता आहे.

sharad pawar maharashtra vidhan sabha election
19 / 31

आता निवृत्ती नव्हे, शरद पवार पुन्हा कंबर कसून तयार; कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकल्या, परंतु विधानसभा निवडणुकीत ४९ जागांवर समाधान मानावे लागले. अजित पवार गटाने ४१ जागा जिंकून शरद पवारांवर मात केली. शरद पवारांनी पुढील वाटचालीचे संकेत दिले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची पत पुन्हा मिळवण्याची संधी आहे. पक्षाचे पुढील नेतृत्व आणि शरद पवारांच्या राजकीय भवितव्याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.

Devendra Fadnavis Pune jain
20 / 31

“भारताच्या जीडीपीमध्ये जैन समाजाची भागीदारी”, देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात विधान

राज्यात मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील बिबवेवाडी येथे जैन समाजाच्या बीजीएस नॅशनल कॉन्वेशनला हजेरी लावली. त्यांनी जैन समाजाच्या उदारमतवादी विचारसरणीचं आणि भारताच्या जीडीपीमध्ये त्यांच्या योगदानाचं कौतुक केलं. फडणवीस म्हणाले की, भारताला ५ ट्रिलिअन इकॉनॉमी बनवण्याच्या मार्गात जैन समाजाचा मोठा वाटा आहे. तसेच, जैन समाज देणाऱ्यांमध्ये अग्रस्थानी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Akshay Kharodia announces separation from wife Divya
21 / 31

तीन वर्षांत मोडला संसार, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

टीव्ही विश्वातून एक वाईट बातमी आली आहे. 'पंड्या स्टोअर' फेम टीव्ही अभिनेता अक्षय खरोडियाने लग्नाच्या तीन वर्षानंतर पत्नीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. अक्षयने त्याच्या लग्नातील फोटो शेअर करून ही माहिती दिली. या जोडप्याला दोन वर्षांची मुलगी रुही आहे, तिचं संगोपन दोघेही मिळून करणार आहेत.

Aditya Pancholi daughter was replaced by Kangana Ranaut in her debut film
22 / 31

कंगना रणौतने एक्स बॉयफ्रेंडच्या मुलीला पहिल्याच चित्रपटात केलेलं रिप्लेस, झाला मोठा खुलासा

बॉलीवूड November 30, 2024

अभिनेता आदित्य पंचोली आणि अभिनेत्री झरीना वहाब यांचा मुलगा सूरज पंचोलीने २०१५ मध्ये 'हिरो' चित्रपटातून पदार्पण केले. त्यांची मुलगी सना पंचोलीनेही चित्रपटांमध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. २००५ मध्ये 'शाकालाका बूम बूम'मधून पदार्पण करणार होती, परंतु तिची जागा कंगना राणौतने घेतली. झरीना वहाबने सांगितले की सनाला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. मात्र, सनाने अभिनयाचा कोर्स केला होता आणि वास्तववादी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

eknath shinde daregao vishan sabha election
23 / 31

एकनाथ शिंदे दरेगावात, मतदार बुचकळ्यात, नेमका मोठा निर्णय काय असेल? शिरसाटांचं स्पष्टीकरण!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्यासाठी गावी गेले आहेत, त्यामुळे तर्क-वितर्क सुरू आहेत. संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं की शिंदे सरकार स्थापनेत अडसर आणणार नाहीत आणि भाजपाच्या निर्णयाला मान्य करतील. राज्य वाऱ्यावर नाही, शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Ira Khan on parents divorce
24 / 31

“जे झाले ते…”, आयरा खानचे आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत भाष्य

बॉलीवूड November 30, 2024

आमिर खानची मुलगी आयरा खान मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलते. ती मेंटल हेल्थ सपोर्ट ऑर्गनायझेशनची संस्थापक आणि सीईओ आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा तिच्या मानसिक आरोग्यावर फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगितले. तिच्या पालकांनी कधीच मुलांसमोर भांडण केले नाही आणि त्यांचे नातं योग्य पद्धतीने संपले. घटस्फोटानंतरही दोघांनी मुलांना समान प्रेम दिले.

mva future amid maharashtra vishan sabha election 2024 results
25 / 31

मविआ फुटणार? दोन पक्षांमधून स्वतंत्र लढण्याची भूमिका, तिसऱ्याचं मौन! नेमकं काय घडतंय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल सत्ताधारी महायुतीसाठी आश्चर्यकारक ठरले, ज्यात त्यांनी २३५ जागा जिंकल्या. मविआला फक्त ४९ जागा मिळाल्याने काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. काही नेते स्वतंत्र लढण्याची मागणी करत आहेत. अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

Nana Patekar leaves Indian Idol 15 contestant speechless
26 / 31

“अंकशास्त्र बकवास आहे”, इंडियन आयडलच्या स्पर्धकाला स्पष्टच बोलले नाना पाटेकर, Video Viral

'इंडियन आयडल'च्या १५व्या पर्वात नाना पाटेकर हजेरी लावणार आहेत. प्रोमोमध्ये नाना स्पर्धक मिस्मी बोसूला अंकशास्त्रावर विश्वास आहे का, असे विचारतात. तिच्या होकारानंतर नाना तिला शोचा विजेता कोण असेल, विचारतात. मिस्मी गप्प राहते. नाना तिला सांगतात की अंकशास्त्र बकवास आहे, चांगलं गाणं हेच सत्य आहे. नानांच्या या स्पष्ट बोलण्यामुळे मिस्मी व परीक्षकांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. नाना पाटेकर 'वनवास' चित्रपटात दिसणार आहेत.

sidhanta mohapatra on pm narendra modi guidance
27 / 31

Video: “मोदींकडून इतरांशी कसं वागायचं ते शिकलो”, भाजपा खासदाराची प्रतिक्रिया चर्चेत!

देश-विदेश November 30, 2024

हल्ली राजकीय भाषेचा स्तर खालावला आहे, अशी चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनात वर्तन कसं ठेवावं याचे धडे देण्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. ओडिशामध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. भाजप खासदार सिद्धांता मोहपात्रा यांनी मोदींकडून सार्वजनिक जीवनात वर्तन कसं ठेवावं, समस्यांचा सामना कसा करावा हे शिकल्याचं सांगितलं.

Rohit pawar on anna hazare
28 / 31

“अण्णा हजारे आजारी असतील, भाजपाची सत्ता आल्याने…”, रोहित पवारांची खोचक टीका

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनावर भाष्य करताना अण्णा हजारे यांच्यावर टीका केली. पवार म्हणाले की, भाजपाची सत्ता असल्याने अण्णा हजारे आंदोलन करत नाहीत. तसेच, त्यांनी बाबा आढाव यांना माघार घेण्याचा सल्ला दिला आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असेही सांगितले.

Mallikarjun kharge and rahul gandhi
29 / 31

राज्यात काँग्रेसची पीछेहाट, कारणं काय? भर बैठकीत खरगेंनी नेत्यांना सुनावलं!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालांवर काँग्रेसची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील नेत्यांची कानउघाडणी केली आणि राष्ट्रीय नेत्यांवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी बेरोजगारी, महागाई, जात जनगणना यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. संघटनात्मक पातळीवर सुधारणा आणि एकजूट राखण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

balasaheb thackeray hindutva bjp amid maharashtra vidhan sabha election results
30 / 31

हिंदुत्वाचा मुद्दा मूळचा बाळासाहेब ठाकरेंचा, नंतर तो भाजपानं उचलला; १९८७ साली काय घडलं?

राज्यात नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा सुरू आहे. भाजपा व महायुतीसाठी हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी हिंदुत्वाचा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंचा असल्याचं सांगितलं. लोकसत्ताच्या कार्यक्रमात त्यांनी आणि संजीव साबडे यांनी निवडणूक निकालांचं विश्लेषण केलं. शिवसेना-भाजपा युतीच्या इतिहासावर गिरीश कुबेर यांनी भाष्य केलं. भाजपा हळूहळू शिवसेनेचा प्रभाव घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

Sushma Andhare
31 / 31

महिला मुख्यमंत्री पदावरून सुषमा अंधारेंची भाजपावर बोचरी टीका

राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असून, एकनाथ शिंदेंनी माघार घेतली आहे. भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप समोर आलेला नाही. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी भाजपाला प्रश्न विचारले आहेत. त्यांनी विचारले की, भाजपात एकही महिला मुख्यमंत्री पदासाठी लायक नाही का? तसेच, ५ डिसेंबरला शपथविधी होणार असल्यास राज्य कोणाच्या भरवश्यावर चालणार आहे?