८०० कोटी कमावणाऱ्या ‘छावा’ला ओटीटीवर एका आठवड्यात किती व्ह्यूज मिळाले? वाचा…
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. विकी कौशलच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींहून अधिक कमाई केली. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ११ एप्रिलला रिलीज झाल्यानंतर 'छावा'ला जागतिक स्तरावर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या आठवड्यात २.२ मिलियन व्ह्यूज मिळाले असून, नॉन इंग्लिश फिल्म्समध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.