हिमाचल : काँग्रेसच्या मंत्र्याचं भाषण ऐकताच भाजपा आमदारांचा जल्लोष, तर मुख्यमंत्री स्तब्ध
हिमाचल प्रदेशच्या शिमला येथील संजौली भागातील मशिदीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विधानसभेत भाजप आमदारांनी अवैध इमारतीचा मुद्दा उपस्थित केला. पंचायत राज मंत्री अनिरुद्ध सिंह यांनी यावर उत्तर दिलं, ज्यामुळे भाजप आमदारांनी त्यांचं कौतुक केलं. स्थानिक आमदार हरीश जनार्थ यांनी मशिदीला बेकायदेशीर म्हणणं चुकीचं ठरवलं. तर, अनिरुद्ध सिंह यांनी राज्यात परप्रांतीयांची नोंदणी करण्याची मागणी केली.