पुण्यात डीजेवर बंदीची मागणी; देशात ध्वनिप्रदूषणाचा कायदा आणणारे डॉ. यशवंत ओक कोण?
पुण्यात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील ध्वनिप्रदूषणविरोधी कायद्याचे जनक डॉ. यशवंत ओक यांचा विस्मृतीत गेलेला लढा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ८० च्या दशकापासून त्यांनी वैज्ञानिक पुरावे आणि न्यायालयीन याचिकेद्वारे ध्वनिप्रदूषणाला सार्वजनिक आरोग्याचा धोका म्हणून सिद्ध केले. त्यांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यामुळेच देशात २००० साली 'ध्वनिप्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियमावली' अस्तित्त्वात आली.