केतन दरीत कोसळल्यानंतर सिया गोयल काय ओरडत आली? लोहगडाच्या सुरक्षा रक्षकाने काय सांगितलं?
केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून हत्या करण्यात आली, असा आरोप त्याच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आहे. सुरुवातीला पोलिसांनाही हा अपघात वाटला, पण केतनच्या कुटुंबाने संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपास केला. २३ जून रोजी सिया आणि चेतनला अटक करण्यात आली. सियाने दिलेली माहिती विसंगत असल्याने तिच्यावर संशय वाढला. लोहगडाचे सुरक्षा रक्षक धीरज जाधव यांनी सियाच्या ओरडण्याबाबत माहिती दिली.