सिया चेतनचा नवा स्नॅपचॅट रोमँटिक व्हिडीओ समोर, २३ मे रोजी भेट झाल्याची माहिती
केतन अग्रवाल यांची हत्या १८ जून रोजी पुण्यातल्या लोहगडावरुन ढकलून देत करण्यात आली. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. सियाच्या आई-वडिलांनी चेतन आणि सियाच्या प्रेमसंबंधांची कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र, २३ मे रोजीचा सिया आणि चेतनचा रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे. सियाच्या कुटुंबाने या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.