वैष्णवीच्या दिराची ‘सुना इतिहास घडवतात’ म्हणणारी पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणाले; “लोका….”
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रात चर्चेत आहे. हगवणे कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी वैष्णवीच्या नवरा शशांक, नणंद करीश्मा, सासू लता, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुशील हगवणेची एक जुनी पोस्ट चर्चेत आली असून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.