“माझ्यासमोर पुलाचे लोखंडी रॉड…”, कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमीने सांगितला विदारक प्रसंग!
पुण्याच्या मावळमध्ये कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने पाण्यात पडलेल्या इतर सर्व नागरिकांना वाचवले आहे. सोमवारी सकाळी ड्रोनच्या सहाय्याने नदीची पाहणी होणार आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुलावर गर्दीमुळे आणि बाईकच्या हालचालींमुळे पूल कोसळल्याचे जखमींनी सांगितले.