‘पडळकर यांच्या मिरवणुकीत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे फलक’, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मिरवणुकीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकविल्याबद्दल कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच तुर्कियेच्या मालावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्यांचे अभिनंदन करत, राष्ट्र प्रथम ही भावना महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.