‘मिसिंग लिंक’नंतर आणखी मोठा प्रकल्प! मुंबई ते पुणे प्रवास केवळ ९० मिनिटांत
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे नवीन द्रुतगती मार्ग उभारण्याचे नियोजन सुरू आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या आहेत. १३० किमी लांबीचा हा मार्ग रायगड जिल्ह्यातील चौकपासून पुण्याच्या बाह्यवळण मार्गाशी जोडला जाईल. १५ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास ९० मिनिटांत होईल.