‘विश्वास नांगरे पाटील बोलतोय’, पुण्यातील निवृत्त शिक्षक दाम्पत्याला ‘डिजिटल अरेस्ट’
पुण्यातील खेड तालुक्यात एका ७४ वर्षीय निवृत्त महिला शिक्षिकेला सायबर गुन्हेगारांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली तब्बल ६८.८ लाख रुपयांना गंडवले. "मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय," अशी खोटी ओळख सांगून, भामट्यांनी या दाम्पत्याला महिनाभर घरात ओलीस ठेवलं. अखेर, टीव्हीवर खऱ्या विश्वास नांगरे पाटलांना पाहून फसवणूक लक्षात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे.