पुणे: मोठ्या ‘आवाजा’वर कारवाई, ध्वनिप्रदूषण प्रकरणात ११६ खटले दाखल
पुणे : दहीहंडी उत्सवात आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ध्वनिप्रदूषण प्रकरणात पोलिसांनी ११६ खटले दाखल केले आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणेतील चार प्रेशरमीड, चार प्लाझ्मा साउंडसह सहा ध्वनीक्षेपक यंत्रणा जप्त करण्यात आली आहेत.