पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; ‘या’ भागात सर्वाधिक प्रसार!
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ व्याधीची चर्चा आहे. एका महिलेला या व्याधीवर यशस्वी उपचार मिळाल्यानंतर आता पुण्यात २२ संशयित रुग्ण आढळले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये या आजाराशी संबंधित लक्षणं असणारे रुग्ण दाखल झाले आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड परिसरातील असल्याचं समजतं.