“ही एक प्रकारे हत्याच”; पुण्यातील संशयास्पद मृत्यूप्रकरणी मृख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
पुण्यातील संशयास्पद मृत्यूप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. विषारी दारुमुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी काही जणांना अटक होऊ शकते. फडणवीस यांनी पोलिसांना कोणाचीही गय न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिथेनॉलसारखा पदार्थ मिक्स केल्याचा संशय असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.