पुण्यात TCS कंपनीच्या वॉशरुममध्ये २४ वर्षीय इंजिनिअरची आत्महत्या; कारण काय?
पुण्यातील हिंजेवाडी येथील टीसीएस कंपनीच्या प्रसाधनगृहात २४ वर्षीय आयटी इंजिनिअर सुजल विनोद ओस्वाल याने मोबाइल चार्जरच्या वायरने आत्महत्या केली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत बेटिंगमुळे आर्थिक नुकसान झाल्याने तणावात असल्याचे समोर आले.