‘आरोपीची शेंडी कापू नका’, कोर्टाचा स्पष्ट आदेश; भोंदू ऋषीकेश वैद्यची जेलमध्ये रवानगी
पुणे: दैवीशक्तीचा संचार असल्याचे भासवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या ऋषीकेश वैद्यला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वसईतील महिलेच्या तक्रारीनंतर वैद्यला अटक करण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी वैद्यच्या लैंगिक क्षमता चाचणीसह इतर तपासाची माहिती दिली. बचाव पक्षाने विरोध केला तरी न्यायालयाने वैद्यला न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच, वैद्यची धार्मिक शेंडी कापू नये, असे आदेश दिले.