प्रचारसभांना सुप्रिया सुळे का नाहीत? अजित पवारांचं मिश्किल उत्तर; म्हणाले…
लोकसभा आणि विधानसभेला एकमेकांविरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादीचे दोन गट आता पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. अजित पवार प्रचारसभांमध्ये सक्रिय दिसत आहेत, तर सुप्रिया सुळे कुठेच दिसत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सांगितले की, सुप्रिया सुळे त्यांच्या पाठीशी आहेत. सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडियावर त्यांच्या उपस्थितीची माहिती दिली.