तोरणा गडावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्यामुळे घडली घटना
तोरणा गडावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या रणजीत शिंदे या पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ८ फेब्रुवारीला ही घटना घडली. रणजीत आणि फजीलत खान रात्री ११ वाजता गडावर चढायला सुरुवात केली होती. रणजीतला छातीत वेदना होऊन तो बेशुद्ध झाला. फजीलतने पोलिसांना कळवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्याला खाली आणले. पहाटे ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.