“साडी नेसल्यावर कंबर दिसते, यात अश्लिलता काय?” गुन्हा दाखल झाल्यावर राधा पाटील संतापली
पुण्यातील बिबवेवाडीतील दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी लावणी नृत्यांगना राधा पाटील आणि मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधा पाटीलने टीव्ही ९ मराठीबरोबर बोलताना कार्यक्रमाला परवानगी नसताना पोलीस उपस्थित का होते, असा प्रश्न उपस्थित केला. तिने सांगितले की, परवानगीशिवाय कधीच शो करत नाही आणि तिच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला.