कॅमेऱ्यासमोर झालेल्या मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया!
पुण्यात गणेशोत्सव आणि सार्वजनिक सणांमध्ये डीजे व लाऊडस्पीकरच्या विरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बापट यांनी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केली होती. 'टीव्ही ९' वृत्तवाहिनीशी संवाद साधताना काही तरुणांनी त्यांना मारहाण केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.