“मी जिवंत असेन तर मोर्चात जाणार”; विद्यानंद बापट यांचं मोठं वक्तव्य
पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बापट यांच्या समर्थनार्थ आणि ‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "मी जिवंत असेन तर मोर्चात सहभागी होणार आहे."