विद्यानंद बापट संघटना काढणार? ध्वनीप्रदूषण विरोधातील चळवळीबाबत केला मोठा खुलासा
विद्यानंद बापट यांनी पुण्यात गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. बापट यांनी ध्वनीप्रदूषण विरोधातील चळवळीला संघटनात्मक स्वरूप देण्याचा विचार मांडला आहे. "आम्ही वेगळी संघटना सुरू करू किंवा दुसऱ्या संघटनेत सामील होऊ हा मुद्दाच नाही. थोडक्यात सांगायचं तर आमचं साध्य जिथे-जिथे एक असेल, इशू बेस्ट अलायन्स हा कायम नियम असेल."