राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? अजित पवारांचं सूचक विधान
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्र आले आहेत. यामुळे हे दोन्ही पक्ष कायमचे एकत्र येतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या फोटोबाबत विचारलेल्या प्रश्नावर "तुझ्या तोंडात साखर पडो" असे उत्तर दिल्याने सकारात्मक संकेत मिळाले आहेत.