“चांगुलपणाला कुठं नाव असतं?”; मुंबई लोकल प्रवासातील ‘त्या’ तरुणीची मन जिंकणारी गोष्ट!
मुंबई लोकलमध्ये एका तुफान पावसाच्या दिवशी, एक तरुणीने दोन लहान चिक्की विकणाऱ्या मुलांना अडिचशे रुपये देऊन सर्व प्रवाशांना फुकट चिक्की वाटायला सांगितले. लोकांनी सुरुवातीला नकार दिला पण नंतर काहींनी मुलांना पैसे दिले. रात्री, तीच तरुणी एका गजरेवालीकडून ५० रुपयांना गजरे घेतले आणि तिने दिलेल्या चाफ्याच्या फुलांसाठी पैसे देऊ केले. गजरेवालीने फुलं फुकट दिली. या प्रसंगांनी चांगुलपणाची आठवण करून दिली.