वजन ६० टन , ४५० किमी मारकक्षमता; चीन तयार करतोय अणुऊर्जेवर चालणारा पहिला सुपर रणगाडा
China Nuclear Powered Tank: चीनच्या लष्करी संशोधकांनी ४५० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकणारा ६० टन वजनाचा आणि अणुऊर्जेवर चालणारा अत्यंत घातक रणगाडा तयार करण्याची संकल्पना मांडली आहे. यामध्ये ५० मेगाजूल क्षमतेची हायपरसॉनिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन बसवण्यात येणार असून ही सिस्टीम २०४५ पर्यंत पूर्ण क्षमतेने विकसित करण्याचे उद्दिष्ट चीनने ठेवले आहे.