‘ओरेश्निक’ क्षेपणास्त्र किती घातक? कीव्हवर रशियाने डागलेल्या हायपरसॉनिक अस्त्राचा वेध
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर 'ओरेश्निक' या महाविनाशक हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. ध्वनीच्या वेगापेक्षा १० पटीने अधिक वेग असलेल्या या अस्त्राला जगातील कोणतीही संरक्षण यंत्रणा रोखू शकत नाही, असा रशियाचा दावा आहे. ३,००० ते ५,५०० किमीची मारक क्षमता आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची शक्ती असलेले हे 'ओरेश्निक' नेमके काय आहे आणि ते इतके घातक का मानले जाते, याचा सविस्तर आढावा.