Param Indigenous Robot Dog: ‘परम’ रोबोडॉग भारतासाठी ठरणार का रोबोटिक्समधील गेमचेंजर?
राष्ट्रीय AI परिषदेत गलगोटियास विद्यापीठाच्या वादामुळे भारतीय स्टार्टअप General Autonomy च्या PARAM रोबोडॉगचे यश दुर्लक्षित राहिले. PARAM हा चार पायांवर चालणारा, जिने चढणारा, अडथळे पार करणारा आणि स्वयंचलित नेव्हिगेशन असणारा भारतीय रोबोट आहे. त्याची रचना, यांत्रिक बांधणी, कंट्रोल सिस्टीम आणि AI-आधारित नेव्हिगेशन भारतात विकसित करण्यात आले आहे. PARAM हा भारताच्या AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची शक्यता दर्शवतो.