व्हीटूव्ही प्रणालीमुळे अपघात कमी होणार; नजरेला दिसत नसलेला धोकाही ड्रायव्हरला कसा कळणार?
भारतात वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय व्हेईकल-टू-व्हेईकल (V2V) संवाद प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे. C-V2X तंत्रज्ञान आणि 5.9 GHz स्पेक्ट्रम वापरून वाहने ३०० मीटरच्या अंतरावरून पूर्वइशारा देऊ शकणार आहेत. १ ऑक्टोबर २०२७ नंतरच्या वाहनांसाठी ही प्रणाली लागू होणार असल्याचे समजते. ही प्रणाली ADAS पेक्षा वेगळी कशी आहे आणि यातील सायबर सुरक्षेचे धोके काय आहेत? वाचा सविस्तर