२,००० वर्षांपूर्वीचा ‘अॅनालॉग कॉम्प्युटर’?; इतिहासाला पडलेलं कोडं
१९०१ साली ग्रीसच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेले अँटिकायथेरा यंत्र हे जगातील पहिले अॅनालॉग कॉम्प्युटर मानले जाते. हे यंत्र सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या हालचालींचा अंदाज व्यक्त करू शकत होते. संशोधकांनी एक्स-रे आणि 3D स्कॅनिंगच्या मदतीने यंत्राचा अभ्यास केला. हे यंत्र प्राचीन ग्रीक वैज्ञानिक परंपरेत तयार झाले असावे, असा कयास आहे. इतके प्रगत तंत्रज्ञान त्या काळात कसे अस्तित्वात होते, हा आजही एक गूढ प्रश्नच आहे.